Sunday, July 17, 2011

प्रार्थना - ध्येय गीत

प्रार्थना - ध्येय  गीत
मना मनात जगवा मंत्र आज हा नवा,
आपुला समाज नेऊ आम्ही परम वैभवा,
     अंतरी जुगाईची मूर्ती असे स्थापिली,
     शक्ती,बुद्धी संपदा असे तिनेच अर्पिली,
      चित्त हि तिचे तिचीच कीर्ती मान्यता,
      भक्ती तिची सौख अन वैभवात धन्यता,
संचरी जगी स्मरू तिचाच गाऊ जोगवा,
आपुला समाज नेऊ आम्ही परम वैभवा,
      शक्ती,शील,भक्ती अन ध्येय निष्ठ एकता ,
      करू सजीव जीवनात त्याग आणि धन्यता ,
      एक आस मार्ग हाच सर्वा संग चालणे,
      रक्षुनी धर्मास आणि परस परांस राखणे,
शक्ती साठऊन आज राष्ट्र धर्म जगवा,
आपुला समाज नेऊ आम्ही परम वैभवा,

No comments:

Post a Comment