//आवाहन //
भंगली देवालये करावी,मोडिली सरोवरे बांधावीत /
सोफे धर्मशाळा चालवावी,नूतनची कार्ये //
नाना रचना जीर्ण जर्जर,त्यांचे करावे जिर्णोद्धार
/
पडिले कार्य ते सत्वर,चैवीत जावे //
संत-महंतांचे मनातील विचार आपल्या हृदयाशी अचूक भिडतात,तेंव्हा काही उत्तम कार्य करण्याची उर्मी मनात दाटते.श्री जुगाई मातेच्या देवळाची नवनिर्मिती आणि परिसराचे सुशोभीकरण हे आपले सर्व कोसुम्बवासियांचे स्वप्नच नव्हे तर जीवित साध्यच.ते सत्वर करावे अशी श्री जुगाईची इच्छा आणि म्हणूनच ती आपल्या मोठे
मानकरी श्री.दयाराम दादा,तसेच सर्व वडिलधाऱ्या मंडळींच्या व आपणा सर्वांच्या मनात रुजून आली आहे.
सर्व शक्ती पणाला लाऊन सुबक आणि सुशोभित देवालय निर्माण करूया. आपण सर्वांनी एकमताने हे कार्य तन,मन,धन अर्पून तडीस न्यावयाचे आहे.श्री जुगाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच,थोरामोठ्यांचे सहकार्य व तरुणांच्या कार्यशक्तीच्या बळावर आपण ते नक्कीच करू यात शंका नाही.हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे,अशी संधी आपल्या जीवनात एखादेच वेळी येते,आणि आपले भाग्य कि ती आज आपणा सर्वाना लाभली आहे.
No comments:
Post a Comment