Friday, March 19, 2021

शंभूसिंह जाधवराव.

  बांदल सेनेत एक अनाम सरदार होतेअतिशय शूर मातब्बर घराण्यातील. स्वराज्यासाठी शिर तळहातावर घेवून लढणारे शंभूसिंह जाधवराव सरसेनापती धनाजी जाधवरावांचे तिर्थरुप व राजे लखुजी जाधवरावांचे नातू.

               प्रचलित घोडखिंडीच्या वरच्या बाजूस असणार्‍या शाहूवाडीतील येलवन जुगाई गावाच्या जंगलातून पांढरपाणी गावाला जोडणारी अरुंद खिंड खरी घोडखिंड.फाजलखानाला बांदलांनी या भागात खेचून आणले.पहिली हातघाई याच ठिकाणी झाली फाजलखानाची ताजी फोैज व धावून दमलेले मराठे.शंभूसिंहानी पहिला हल्ला अंगावर घेतला.शर्थीची तलवार अशी गाजवली कि शत्रू थोडा मागे हटला शिवरायांना तेवढा अवधी जास्त मिळाला.मग मागून मोठ्या संख्येने आलेल्या शाहि फोैजे समोर एक एक मराठा कामी येवू लागला तसा शंभूसिंहानी मोर्चा सांभाळला.देवगिरीच्या यादवांच्या वंशजांनी शत्रू पासून आपल्या शिवरायांचा बचाव करीत प्रथम या पावनखिंडीत देह ठेवला.रक्ताच्या थेंबानी खिंड पावन केली.अश्या या अनामविराला शतश: मानाचा मुजरा. .

          सहसा कोणत्या इतिहास संशोधक या महापराक्रमी घराण्याचा इतिहास मांडत नाहित.ते असामान्य सरदार होते शिवरायांच्या कमांडो बांदल सेनेचे सरदार भरोश्याचे एकदम एकनिष्ठ अगदि प्रतापगडाच्या युध्दा पासूनचे.

अनामविराला पणतीच्या प्रकाशाने उजळून आपल्या समोर ठेवायचा हा माझा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न. .

अनामविरा इथे जाहला तुझा जिवनांत।

स्तंभ इथे ना कुणी बांधला पेटली न वात॥


(

No comments:

Post a Comment