जाधवांचा दैदिप्यमान इतिहास.
सर्व भारतभर जाधव कुळे पसरलेली आहेत.महाराष्ट्राच्या व आपल्या दृष्टीने सेऊन यादव कूळ महत्वाचे आहे.इ.स.८५० ते १३३४ पर्यंत अनेक यादव राजे महाराष्ट्रात उदयास आले.त्यांनी आपल्या सीमा तुंगभद्रे पासून नर्मदे पर्यंत वाढविल्या.महाराष्ट्र,उत्तर कर्नाटक,मध्यप्रदेश्यात त्यांची सत्ता होती.प्रथम नासिक जवळील अंजनेर येथे राजधानी स्थापण्यात आली नंतर भिल्लम ५ वा राजाने ती देवगिरी येथे हलविली.अंजनेरीच्या सेऊनचंद्र यादव याच्या नावाने यादव सेऊन यादव याच नावाने प्रसिद्ध झाले.तो स्व:तास महासामंत म्हणवत असे.
सुरवातीच्या काळात पश्चिम चालुक्यांचे मांडलिक राजे म्हणून राज्य केले.जसे चालुक्य कमकुवत झाले तसे १२ व्या शतकात स्वतंत्र यादवांची सत्ता स्थापन केली.काही इतिहासकारांचे मते यादव हेच खरे मराठे होत व याच कुळाने पहिले मराठ्यांचे राज्य स्थापन केले.यादव कूळ हे चंद्रवंशी असून हेमाद्रीच्या मते सेऊन यादव मथुरा येथून द्वारकेस आले.हेमाद्री(हेमाडपंत)त्यांस "कृष्ण कुलोत्पन्न" असे म्हणे,तर ज्ञानेश्वर महाराज त्यांस "यादवकुळवंश तिलक " असे संबोधत.

या यादव कुळात पराक्रमी राजे होऊन गेले.भिल्लम पाचवा(११७३ ते ११९२) याने देवगिरी येथे राजधानी वसविली.सिंघन दुसरा हा महाप्रतापी होता त्याने यादवांचे राज्य तुंगभद्रे पासून नर्मदे पर्यंत वाढविले.याचा नातू रामदेवराय(१२७१ ते १३०९) पर्यत राज्य केले.सन १२९४ ते १३०९ या काळात अल्लाउद्दिन खिलजीने अनेक वेळा देवगिरीवर स्वारी केली व यादवांची सारी संपत्ती लुटून नेली.रामदेवरायास खिलजीचे मांडलिकत्व पत्करावे लागले.सिंघान तिसरा याने परत बंडखोरी केली.पण मलिक काफूर बरोबरच्या लढाईत तो मारला गेला व परत यादव पारतंत्र्यात लोटले गेले.यादवांनी आपली सत्ता वाचविण्याचे आटोकाट सतत प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.सन.१३१७ मध्ये महमद तुघलकाने देवगिरीचे दौलताबाद असे नामकरण केले व यादवचे राज्य खऱ्या अर्थाने लयास गेले.सोन्याचा धूर पाहिलेल्या देव्गीरीत यवनांची सत्ता आली.मराठांचे पहिले खरेखुरे राज्य अस्त पावले.
यादवांनी महाराष्ट्र सर्व बाजूने,सर्व अंगाने समृद्ध केला.मराठी भाषेचा विकास,प्रचार यादव काळातच झाला.त्या काळातील कन्नड व संस्कृत बरोबरच मराठीला राज्य भाषेचा दर्जा प्राप्त झाला.अनेक संस्कृत पंडित, चित्रकार, वास्तुविशारद, संगीत तज्ञ यादवांचे आश्रयास आले.हेमाद्री वा हेमाडपंत हा अनेक विषयात पारंगत होता,भाषा.वास्तुशास्त्र,वनौषधी या वर त्याने ग्रंथ लिहिले.मोडी लिपीचा शोध त्याने लावला.त्याने अनेक मंदिरे बांधून घेतली.त्याने हेमाडपंती या वास्तुरचनेचा शोध लावला.अनेक संस्कृत पंडित यादवांनी पदरी ठेवले.त्यांचे कडून संस्कृत ग्रंथांचे देवनागरी मराठीत भाषांतरे करून घेतली.मराठी भाषेचा वापर सर्वत्र करविला व ती सामान्याची रयतेची भाषा व्यवहारात आणली.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवतगीता मराठीत भाषांतरित करून सामान्य जणांसाठी ज्ञानाची कवाडे उघडली ती याच यादवांचे काळात.जैन मंदिरांना हि देणगी रूपे मदत करून यादवांनी त्यानाही आपलेसे केले.महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी हे पण यादव काळातलेच,मराठीचा वापर त्यांनी आपल्या प्रवचनात केला. यादव राजे अनेक विषयात पारंगत होते.
परमार, चालुक्य, काकतीय, हौसल,सोलंकी राजपूत अशी राज्ये त्या काळी महाराष्ट्रात, गुजरातेत, मध्यप्रदेशात,कर्नाटकात होती.आजूबाजूस महापराक्रमी राज्ये असतानाही यादवांनी आपली सत्ता स्थापून ती वाढविली.
यादव सत्तेचे खालील प्रमाणे वर्गीकरण करणे योग्य वाटते ......
१.चालुक्य मांडलिक सेउलचंद्र ते कालिया बल्लाभा पर्यंत सन ८५० ते सन ११७३.
२.स्वतंत्र यादव सत्ता भिल्लम पाचवा ते रामदेवराय(रामचंद्र) सन ११७३ ते १३१२
३.खिलजीच्या अमलातील राज्य सिंघन तिसरा ते मालुगी तिसरा सन १३१२ ते १३३४.
पुढे महाराष्ट्राचे इतिहासात याच यादव कुळाचे जाधव असे नामकरण झाले व त्या महापराक्रमी कुळाने मराठांच्या स्वातंत्र युध्दात शिवरायांना सर्वतोपरी मदत केली.जिजाऊबाईसाहेब याच पराक्रमी जाधव(सिंधखेड) कुळातील.धनाजी जाधव,संताजी जाधव.चंद्रसेन जाधव,पिलाजीराव जाधव हि नावे सर्व मराठी मुलकात गाजत होती.अश्या जाधव कुळात आपला जन्म झाला हे परमेश्वर कृपेनेच ........
जाधव कुळात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे
ReplyDeleteजाधव कुळात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे
ReplyDeleteMala Abhimanyu aahe mi Jadhav asalyacha.
ReplyDeleteMala abhiman aahe me Jadhav aslyacha
ReplyDelete