Tuesday, March 20, 2012

हॉल वर( मुलाकडील ) लागणाऱ्या सामानाची यादी.

            हॉल वर( मुलाकडील ) लागणाऱ्या सामानाची यादी.
    देवक(रामबाण),रांगोळी,२ पत्रिका,१ खंजीर,१ नारळ सोनेरी,
    देवकासाठी परडी, २ मीटर कोरा कपडा,१/२ मीटर पिवळा कपडा,
    २० द्रोण उलप्यासाठी,१०० देठाची पाने,३० सुपाऱ्या (अखंड),३० रुपये
    सुटी नाणी,३ चादरी,१ अंतरपाट,२ किलो तांदूळ घाण्यासाठी,हळदी
    कुंकुवाचा करंडा,१ गंधगोळी,फुले,५० नारळ,१ सुत गुंडी,आब्याच्या
    ४ फांद्या(मुहूर्त मेढीसाठी),३५ आंब्याची पाने देवाच्या नावे,शकुनाचे
    १०० ग्राम तांदळाचे पीठ,२ परती,४ तांबे,देव पूजेची भांडी,घंटी,१ समई,
    २ निरांजने,तेल वाती,१ अगरबत्ती पुडा,१ आगपेटी,२ रोवल्या,सुरी,
    लिंबू,कोयता,१ मुसळ व ५ काठ्या,मिठाई (मुलगा देवका  जवळ येतो
    त्यावेळी साठी),मुलाचे कपडे,यजमानाचे कपडे,उपरणे,टोपी,इ.,
    यजमाननीचे कपडे,शाल,नथ,छोटी bag ,पेन,वही,४ मोठ्या bags ,
    व गोणी(present साठी)),मुलीच्या साड्या,होमाचे समान,होमपूडी,
    समिधा,कापूर,धूप,१ गुळ-खोबऱ्याची वाटी,पान -जिऱ्याचा  विडा,
    मुलगा लग्नाला जायील तेंव्हा त्याचा अंगावरून नारळ काढणे,
    एक नारळ गाडी समोर फोडणे,मुलगा हॉलवर गेल्यावर मुलाच्या
    अंगावरून नारळ काढणे,२ पाने व सुपारीचा विडा केळीवर टाकणे,
    मुलीसाठीचे दागिने व पैसे विश्वासू माणसापाशी देणे,ओट्या भरण्या
    साठी खण  नारळ वा भांडी घ्यावीत,देवकाचे  समान जर हॉलवर मिळत
    असेल तर घेऊ नये,कन्यादानाचे वेळी १ साडी व ब्लाउज कापड देणे.
       सूचना:        मुलीकडील सामानाची यादी सर्व वर दिल्या प्रमाणेच 
     उलपे खालील प्रमाणे काढणे ........
     १. जागेवला ............................................      हॉलवर  ठेवणे. 
     २. कुलस्वामीला....................................        मानकरी श्री.दयाभाऊ
     ३.  देवक...............................................        घरी खीर करून खाणे.
     ४.  जुगाई .............................................        गावी देवळात गुरवाजवळ देणे,
     ५.  सोंबा...............................................        वा देवांसमोर ठेवणे.
     ६.  पडलकरीन .....................................               "
     ७.  आसरा.............................................               "
     ८.  चंडकी. .............................................              "
     ९.  आजोळचा .......................................          मामा जवळ देणे.
    १०.  प्रभांवलीचा.....................................          देवांची नावे घेऊन घरी फोडणे व
    ११.  चुकी वाकीचा ..................................          सर्वांनी प्रसाद करून खाणे.
     
    

     

No comments:

Post a Comment