Tuesday, March 20, 2012

हॉल वर( मुलाकडील ) लागणाऱ्या सामानाची यादी.

            हॉल वर( मुलाकडील ) लागणाऱ्या सामानाची यादी.
    देवक(रामबाण),रांगोळी,२ पत्रिका,१ खंजीर,१ नारळ सोनेरी,
    देवकासाठी परडी, २ मीटर कोरा कपडा,१/२ मीटर पिवळा कपडा,
    २० द्रोण उलप्यासाठी,१०० देठाची पाने,३० सुपाऱ्या (अखंड),३० रुपये
    सुटी नाणी,३ चादरी,१ अंतरपाट,२ किलो तांदूळ घाण्यासाठी,हळदी
    कुंकुवाचा करंडा,१ गंधगोळी,फुले,५० नारळ,१ सुत गुंडी,आब्याच्या
    ४ फांद्या(मुहूर्त मेढीसाठी),३५ आंब्याची पाने देवाच्या नावे,शकुनाचे
    १०० ग्राम तांदळाचे पीठ,२ परती,४ तांबे,देव पूजेची भांडी,घंटी,१ समई,
    २ निरांजने,तेल वाती,१ अगरबत्ती पुडा,१ आगपेटी,२ रोवल्या,सुरी,
    लिंबू,कोयता,१ मुसळ व ५ काठ्या,मिठाई (मुलगा देवका  जवळ येतो
    त्यावेळी साठी),मुलाचे कपडे,यजमानाचे कपडे,उपरणे,टोपी,इ.,
    यजमाननीचे कपडे,शाल,नथ,छोटी bag ,पेन,वही,४ मोठ्या bags ,
    व गोणी(present साठी)),मुलीच्या साड्या,होमाचे समान,होमपूडी,
    समिधा,कापूर,धूप,१ गुळ-खोबऱ्याची वाटी,पान -जिऱ्याचा  विडा,
    मुलगा लग्नाला जायील तेंव्हा त्याचा अंगावरून नारळ काढणे,
    एक नारळ गाडी समोर फोडणे,मुलगा हॉलवर गेल्यावर मुलाच्या
    अंगावरून नारळ काढणे,२ पाने व सुपारीचा विडा केळीवर टाकणे,
    मुलीसाठीचे दागिने व पैसे विश्वासू माणसापाशी देणे,ओट्या भरण्या
    साठी खण  नारळ वा भांडी घ्यावीत,देवकाचे  समान जर हॉलवर मिळत
    असेल तर घेऊ नये,कन्यादानाचे वेळी १ साडी व ब्लाउज कापड देणे.
       सूचना:        मुलीकडील सामानाची यादी सर्व वर दिल्या प्रमाणेच 
     उलपे खालील प्रमाणे काढणे ........
     १. जागेवला ............................................      हॉलवर  ठेवणे. 
     २. कुलस्वामीला....................................        मानकरी श्री.दयाभाऊ
     ३.  देवक...............................................        घरी खीर करून खाणे.
     ४.  जुगाई .............................................        गावी देवळात गुरवाजवळ देणे,
     ५.  सोंबा...............................................        वा देवांसमोर ठेवणे.
     ६.  पडलकरीन .....................................               "
     ७.  आसरा.............................................               "
     ८.  चंडकी. .............................................              "
     ९.  आजोळचा .......................................          मामा जवळ देणे.
    १०.  प्रभांवलीचा.....................................          देवांची नावे घेऊन घरी फोडणे व
    ११.  चुकी वाकीचा ..................................          सर्वांनी प्रसाद करून खाणे.
     
    

     

Monday, March 12, 2012

साखरपुड्याचे साहित्य

साखरपुड्याचे साहित्य आणि विधी......(मुलीकडील साखरपुडा)
१.     ३ पाट,१ समई,१ निरंजन,२ ताटे,२ परती.
२.     १ तुळसकुंडी,आगपेटी,समईसाठी तेल व वाती,कोयती,
३.     पूजेचे समान,भांडी,तांब्या,ताम्हण,पंचपाळी,पळी-पात्र,घंटी.
४.     आंब्याची सुती ३५ पाने देवाचे नावाने काढण्यासाठी,गुलाबाची फुले,
५.     मुलासाठी शर्ट व प्यान्टचे कापड,१ नारळ
६.     मुलाकडून येणाऱ्या बायकांसाठी ओट्या भरण्यासाठी १२ ब्लाउज पिसे व नारळ.
७.     चहा व फराळाची व्यवस्था .

साखरपुड्याचे साहित्य आणि विधी......(मुलाकडील साखरपुडा) 

१.     रांगोळी,२ मीटर कोरे कापड,१ चादर.
२.     १ किलो आक्खी सुपारी,१०० गरम तुकडा सुपारी.
३.     देठाची नाग्वेलीचे पाने १५० पूजे साठी ,सुट्टे पैसे २० रुपये नाणी,२ किलो तांदूळ,५ नारळ,
४.     सुट्टी फुले,हळद,पिंजर,गंधगोळी,उदबत्ती,५ प्रकारची पाच फले,                  अक्रोड,बदाम,खारीक,हळकुंडे,सुपारी.
५.     ४ किलो पेढे,१/२ साखर,२५ नागवेलीची पक्की पाने खाण्यासाठी, २०० ग्राम सुपारी,तंबाखू,कात.
६.     चुना डबी,आगपेटी,सिगरेट पाकिटे.
७.     साखर साडी,ब्लाउज,परकर,मुलीसाठी गजरे,वेणी,
८.     गुलाबाची २ डझन फुले,याजमानीची ओटी (कापड व नारळ)

हि सामानाची यादी सर्व सामान्यपणे घेण्याची आहे.यातील आहेर सामान ठरल्या प्रमाणे बदलू शकते.

Sunday, March 11, 2012

कोसुंब शिमगा २०१२.

कोसुंब शिमगा २०१२.
कोसुंब गावातील बारभाई विभागातील शिमग्याची काही क्षणचित्रे.............
पालखी खेलविताना
आई जुगाईची,सुखाई,पडळकरीन,वरदान,माउलीची पालखीतील रूपे 
होळीसाठी जमलेले बारभाई